चाइल्डफंड इंडिया आणि HSBC इंडियाने दक्षिण मुंबईतील शुरू

 10 दिवसात 10,000 लसीकरण : चाइल्डफंड इंडिया आणि HSBC इंडियाने दक्षिण मुंबईतील असुरक्षित समुदायासाठी मोठ्या प्रमाणावर लसीकरण मोहीमेची सुरवात केली आहे .


मुंबई (अमन इंडिया)। एचएसबीसी इंडियाच्या सहकार्याने चाईल्डफंड इंडियाने 4 ते 13 ऑक्टोबर दरम्यान दक्षिण मुंबईतील मच्छीमार आणि असुरक्षित समुदायातील लोकांसाठी मोठ्या प्रमाणावर कोविड -19 लसीकरण मोहीम सुरू केली आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका आणि सुराणा हॉस्पिटल, मुंबई यांच्या सहकार्याने या मोहिमेला कुलाबा विधानसभा मतदारसंघाचे आमदार राहुल नार्वेकर आणि 226 च्या नगरसेविका हर्षिता नार्वेकर यांनी कुलाबा येथील एका खाजगी कोविड लसीकरण केंद्रामध्ये ए वॉर्ड अंतर्गत उद्घाटन केले, यांच्या उपस्थितीत भारतातील चाइल्डफंडच्या कंट्री डायरेक्टर नीलम माखीजानी, एचएसबीसी इंडियाच्या कॉर्पोरेट सस्टेनेबिलिटी प्रमुख अलोका मजुमदार, एचएसबीसी इंडियाचे कम्युनिकेशन हेड अमन उल्लाह, डॉ. प्राजक्ता आंबेरकर, वैद्यकीय अधिकारी - आरोग्य, ए वॉर्ड, आणि मच्छिनमार नगरमधील समुदायाचे नेते.


मोहीमेचा भाग म्हणून, दक्षिण मुंबई येथील 10,000 मासेमाऱ्यांना आणि लोकांना शासनाचे निर्देश आणि प्रोटोकॉलनुसार कोविशिल्ड चे पहिले व दुसरे दोन डोस पूर्णपणे मोफत देण्यात येतील. देशातील लसींचा तुटवडा आणि कमतरता यांमुळे ज्या लोकांपर्यंत लसीकरण पोहोचू शकले नाही त्या अल्पभूधारक लोकांना ही मोहीम सेवा देण्यात येत आहे .


मागील 18 महिन्यांपासून, चाईल्डफंड इंडियाने लाखो लोकांना मदत केली आहे ज्यात मुलांचा समावेश आहे, जनजगृती आणि लसीकरण मोहीम, मदत साहित्य, उपजीविकेच्या पुनर्प्राप्ती संधी, मानसिक-सामाजिक सहाय्य आणि आवश्यक वैद्यकीय सहाय्य कोविड-19 प्रतिसादाचा भाग म्हणून सहाय्य केले. ही मोहीम आतापर्यंत 15 राज्यांमध्ये असुरक्षित समाजामधील मुलांसह 8 लाखांपेक्षा जास्त लोकांपर्यंत पोहचवली आहे. 


भारतामधील चाईल्डफंड च्या राष्ट्रीय अध्यक्षा नीलम मखिजानी म्हणाल्या, "या उपक्रमाच्या माध्यमातून, चाईल्डफंड इंडिया आणि HSBC एकत्रितपणे देशाच्या लसीकरण पूर्ण करण्याच्या ध्येयामध्ये सहभाग घेत आहे. लोकांना सुरक्षित आणि शाश्वत ठेवण्यासाठी आमच्या प्रयत्नांमध्ये हातभार लावण्याबद्दल आम्ही HSBC चे आभारी आहोत. मागील 18 महिन्यांपासून, चाईल्डफंड इंडिया महामारीचा झालेला प्रभाव हाताळण्यासाठी अर्ध-शहरी आणि ग्रामीण भागांमध्ये कार्यरत आहे. आमच्या हस्तक्षेपामध्ये 100 प्राथमिक आरोग्य केंद्र आणि सामुदायिक आरोग्य केंद्रांना वैद्यकीय उपकरणे पुरवणे, बाल मैत्रीपूर्ण कोविड केंद्र, कुटूंबांना अन्न, स्वच्छता आणि शैक्षणिक किट देणे, हेतूपूर्ण लसीकरण मोहीमेची सुरूवात करणे आणि सर्वात महत्वाचे, उपजीविकेच्या संधी उपलब्ध करून देणे यासर्वांचा समावेश आहे."


HSBC इंडियाचे कॉर्पोरेट शाश्वतता प्रमुख अलोक मुजुमदार म्हणाले, "कोविड-19 महामारीचे परिणाम फार वाईट पसरले आहेत. या कठीण काळात, मुंबई येथील मासेमारी करणारा समाज विशेष करून असुरक्षित आहे आणि पुरेशा आरोग्य निगांची कमतरता आहे. दक्षिण मुंबई येथील वंचित समाजामध्ये लसीकरण मोहीमेसाठी चाईल्डफंड इंडियाचे भागीदार बनण्यासाठी आम्ही आनंदी आहोत. साथीच्या रोगाचा प्रसार रोखण्यासाठी लसीकरण हा एक प्रभावी उपाय उदयास आला आहे आणि साथीच्या रोगाचा सामना करण्यासाठी आणि आपल्या समुदायाला पाठिंबा देण्याच्या आमच्या विविध प्रयत्नांमध्ये हा नवीनतम उपक्रम आहे.